मोठी बातमी!
100 जणांना अन्नातून विषबाधा, एकाचा मृत्यू
सामूहिक भोजनातून तब्बल 100 नागरिकांना विषबाधा झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. एका धार्मिक कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक भोजनातून तब्बल 100 नागरिकांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. रामप्रेक्ष यादव असं या व्यक्तीचं नाव आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. भोजनानंतर 100 लोकांना रात्री उशिरा मळमळ- उलटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या नागरिकांना या परिसरात असलेल्या वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड रुग्णालय, वरोरा उपजिल्हा रुग्णालय, तसेच स्थानिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली. पोलीस व आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.दरम्यान या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. रामप्रेक्ष यादव असं या व्यक्तीचं नाव आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एकाच वेळेस शंभर जणांना विषबाधा झाल्यानं खळबळ उडाली आहे.