सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; दोन आरोपी फरार, परिसरात खळबळ
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी रविवारी (ता. १४) पहाटे ५ वाजेच्या सुमारास सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला आहे. आरोपींनी सलग ४ राऊंड फायर केल्याची माहिती आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा घटना घडली तेव्हा सलमान खान (Salman Khan) घरीच होता. दरम्यान, गोळीबाराची घटना घडताच पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली आहे. कोणत्याही अज्ञात व्यक्तीला परिसरात येण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे.याआधीही सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिष्णोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्यातील उद्दिष्ट आहे, असं कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका टेलिव्हिजन मुलाखतीत घडपणे सांगितले होतं.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या