धक्कादायक!
16 वर्षांच्या मुलाचा हृद्यविकाराच्या झटक्याने ने मृत्यू
शाळकरी मुलाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नाशिमध्ये धक्कादायक बातमी समोर आली आहे. 16 वर्षीय मुलाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. तेजस विठ्ठल आहेर असं मृत तरुणाचं नाव आहे. शाळकरी मुलाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.नाशिकच्या लहवित गावात ही घटना घडल्यानंतर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद आहे.उन्हाळा सुरू झाला, की साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्याचा काळ म्हणजे उष्माघाताची शक्यता वर्तवली जाते. उष्माघात म्हणजे केवळ उष्णतेचा त्रास किंवा उन्हाचा त्रास नसून, यामुळे इतरही काही आजार संभवतात; पण उष्माघातामुळे हृदयविकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो, हे फार कमी लोकांना माहिती आहे.