मोठी बातमी!
अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त
अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा उद्योजक पती राज कुंद्रा यांच्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ईडीने शिल्पा शेट्टी व राज कुंद्राच्या मालकीची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये शिल्पाच्या नावावर असलेल्या जुहूतील फ्लॅटचाही समावेश आहे.
एएनआय’ने एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, ईडीने शिल्पा शेट्टीचा पती रिपू सुदन कुंद्रा म्हणजेच राज कुंद्रा याच्या मालकीची ९७.७९ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. ही कारवाई पीएमएलए २००२ अंतर्गत तरतुदींनुसार करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेल्या जुहूमधील फ्लॅटचा समावेश आहे. याचबरोबर शिल्पा व राज यांचा पुण्यातील बंगला व राज कुंद्राच्या नावावर असलेले इक्विटी शेअर्सही जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती ईडीने दिली आहे.शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. दोघांची तब्बल ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.