भीषण अपघात!अहमदाबाद वडोदरा एक्स्प्रेसवर कारचा भयानक अपघात, 10 जणांचा मृत्यू,

8 जणांनी जागेवरच सोडला जीवही कार अहमदाबादवरून वडोदराला जात होती. नडियादजवळ आल्यानंतर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट ट्रेलरवर जाऊन आदळली.

अहमदाबाद : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. अशातच गुजरातमधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबाद वडोदरा एक्स्प्रेस वे वर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद वडोदरा एक्स्प्रेस वेवर नडियादजवळ ही घटना घडली आहे. भरधाव कार एका ट्रेलरवर आदळली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ही कार अहमदाबादवरून वडोदराला जात होती. नडियादजवळ आल्यानंतर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट ट्रेलरवर जाऊन आदळली. हा अपघातात इतका भीषण होता की, यात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जणांना रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळावर 108 ची रुग्णवाहिका पोहोचली आहे. बचावकार्य सुरू आहे

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या