नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात 2 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी
नागपूरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर स्कॉर्पिओ जाऊन आदळली.
नागपूरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर स्कॉर्पिओ जाऊन आदळली.या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.रविवारी रात्री हा अपघात झाला आहे, नियंत्रण सुटल्यानं स्कॉर्पिओ ट्रकवर जाऊन आदळली, नागपूरच्या बुट्टीबोरी परिसरात हा अपघात झाला आहे.
अपघातग्रस्त स्कॉर्पिओमधून श्रीवास्तव कुटुंबातील सहा जण व चालक असे एकूण सात जण प्रवास करत होते. त्यापैकी एका दाम्पत्याचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.