हृदयद्रावक घटना!
नवरदेवाच्या भावासह ५ ठार
आग्राच्या यमुना एक्स्प्रेसवेवर भरधाव कार डिवाडरला धडकून उलटल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रत वाहनांमधील सर्व जण लग्न समारंभासाठी असताना ही दुर्दैवी घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आग्रा येथे कार दुभाजकाला धडकून पलटी होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य तिघे जखमी झाले. गाडीमधील सर्वजण शनिवारी रात्री उशिरा लग्न समारंभासाठी ग्रेटर नोएडाहून बिहारमधील देवरियाला जात होते. याचवेळी एतमादपूर पोलीस स्टेशन हद्दीतील यमुना एक्स्प्रेसवेवरील कुबेरपूर वळणावर भरधाव कार दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. दुर्घटनेतील जखमींना एसएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. गाडीचा अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.