गोंदिया हादरलं
व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या
गोंदियामध्ये व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
गोंदियामधून हादरवणारी घटना समोर आली आहे. रेती व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोलू तिवारी असं या व्यावसायिकाचं नाव आहे. टीबी टोली ते कुडवा नाका परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान गोलू तिवारी यांच्या हत्येनंतर शहरात तणावाचं वातावरण असून, तिवारी यांच्या समर्थकांकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान गोळीबाराची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.