विवादित धामणगाव वाळू डेपो चौकशी नकरता सुरू करण्याची लगीनघाई!
तक्रार कर्त्याला माहिती न देताच वाळू घाटा त तपासणी?
सुट्टीच्या दिवशी तपासणी करणारा तो शासकिय अधिकारी कोण?
धामणगाव रेल्वे शासकीय वाळू डेपोत सारवासारव सुरू
जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्याची वाळूघाटात आकस्मिक भेट ?
कुणालाच माहिती नसल्याने भेटीचा तपशिल गुलदस्त्यात?
तालुका प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे: धामणगाव रेल्वे तालुक्यातील शासकीय वाळू डेपोतील गैरकारभारांचा पर्दाफाश करताच महसूल प्रशासन खडबडून जागे झाले असून वाळू डेपो पुन्हा सुरू करण्यासाठी सारवासारव सुरू झालाय आहे दरम्यान आज सुटीच्या दिवशी जिल्हा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने वाळू डेपोला भेट दिली असून त्यांच्या सोबत काही पत्रकार असल्याचे बोलल्या जात आहे. एकीकडॆ ही सारवासारव सूर असतानाच खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार तालुक्यातील 30 च्या मृत घरकुलधारकाना वाळू वितरित केल्या गेल्याची धक्कादायक बाब पुढे आली असून त्यातील काही लोकं तर दोन वर्षांपूर्वीच मेलेली आहेत…. दोन वर्षांपूर्वी च मेलेल्या त्या अनेक लोकांना रॉयल्टी मिळाली कशी ?हा मोठा सवाल उपस्थित झाला आहे
धामणगाव रेल्वे तालुक्यातील शासकीय वाळू डेपोत अनागोंदी माजली असून अनेक घरकुलधारकाना मितीदगड मिश्रित रेती दिल्या गेली तर दुसरीकडे अनेकांचे घरकुल वाळू साठा नसल्याची सबब सांगून रोखल्याने बांधकाम रखडले आहे अश्या कारभारामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देत शासकीय वाळू डेपो पुढील आदेशपर्यंत बंद केला आहे असे असताना शासकीय वाळू डेपो पुन्हा सुरू करण्याची सारवासारव सुरू झाली असून आज सुट्टीच्या दिवशी गोकुलसरा रेती घाटात एक लाल दिव्याची गाडी येऊन पाहणी करून गेल्याची चर्चा आहे सदर अधिकारी कोण?त्यांनी काय पाहणी केली? गोकुलसरा नदीपात्रात 40 40 फुटांचे खड्डे पडले आहेत त्याचे मोजमाप झाले काय?झाले असल्यास वाळु नीविदा करार मोडल्या गेला का? मोडला गेला असल्यास काय कारवाई झाली? तक्रारकर्ते गोकुलसरा सरपंच यांना अधिकारी येणार असल्याबाबतची माहिती का दिली नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून याची उत्तरं प्रशासन देऊन सामान्यांना दिलासा देणार का? हा खरा सवाल आहे.