CSMT स्थानकात शिरताना लोकल ट्रेनचा डबा घसरला;.

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरल्याची घटना सोमवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. ट्रेनचा वेग कमी असल्याने सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, यामुळे हार्बर लाईवरील रेल्वे वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल येथून निघालेली लोकल ट्रेन सकाळी ११.३५ वाजता सुमारास CSMT स्थानकाजवळ पोहचली. प्लॅटफार्म क्रमांक २ वर प्रवेश करत असताना अचानक लोकलचा एक डबा रुळावरून घसरला.

यामुळे मोठा आवाज होऊन ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना झटका बसला. लोकलचा डबा घसरताच प्रवासी चांगलेच धास्तावले होते.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या