नाशिक अपघातात मृतांचा आकडा १० वर

नाशिक अपघात.. मृतांचा आकडा वाढला १० मृत


मुंबई आग्रा महामार्गावर जळगावकडून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृतांचा आकडा वाढला असून  प्रवासी जागीच ठार झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसची एक बाजू पूर्ण कापली गेली. यामुळे त्या बाजूला बसलेले प्रवासी रस्त्यावर पडले. यात काहींचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकला धडकल्यानंतर भीषण अपघात झाला.याबाबत मिळालेली माहिती अशी की, एसटी बस जळगावकडून नाशिकला जात होती. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला अशी माहिती समोर येतेय. अपघातात एसटीची एक बाजू कापली गेलीय. घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल पडला होता. अनेक प्रवासी रस्त्यावर पडले. घटनास्थळावरील दृश्ये अंगाचा थरकाप उडवणारी होते. रस्त्यावर मृतदेह पडले होते. ज्या बाजूला धडक बसली त्या बाजूचे प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमी प्रवाशांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

 

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या