नाशिकमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूड जवळ एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.मुंबई – आग्रा महामार्गावर एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून यात ५ प्रवाशी जागीच ठार झाल्याची माहिती समजते. तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. एसटी आणि ट्रकचा अपघात इतका भीषण होता की पाच प्रवासी जागीच ठार झाले. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद पोलिसात झाली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूड जवळ एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवासी ठार झाले असून इतर प्रवासी जखमी झाले आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.