देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, डंपरच्या धडकेत 11 ठार, 10 गंभीर

लखनऊ : देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसला डंपरने धडक दिल्यानं ११ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर इथं घडली. शनिवारी रात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातात १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी असलेले सर्वजण सीतापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येतेय. सर्वणज उत्तराखंडमधील पूर्णागिरी मातेच्या दर्शनाला जात होते.
गोला लखीमपूर रोडवर शनिवारी रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. देवीच्या दर्शनाला जाताना भाविकांची बस एका ढाब्यासमोर थांबली होती. तेव्हा वेगाने येणारा एक डंबर बसला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की जागीच ११ जण ठार झाले

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या