नागपूर हादरल..!
नागपूर मध्ये बेधुंद कारने चिरडल्यानं 2 ठार
गस्त वाढवा
फडणवीसांचे पोलिसांना आदेश
नागपूरमध्ये मध्यरात्री रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील चिरडल्याचं समोर आलं आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर पुन्हा एकदा अपघाताने हादरलं असून दिघोरी नाक्याजवळ हिट अँड रनची घटना घडलीय. मध्यरात्री रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील चिरडल्याचं समोर आलं आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी पाच जणांना अटक केलीय. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर ९ जण झोपले होते. अपघाताचे प्रमाण वाढल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रंक अँड ड्राइव्हची मोहिम तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत.दिघोरी नाक्याजवळ फुटपाथवर एकाच कुटुंबातील ९ जण झोपले होते. यात चार महिला, पुरुष आणि लहान मुले होते. यापैकी महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी कारमध्ये पाच जण होते. कारमधील सर्वजण दारु पिऊन असल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी पाच जणांना अटक केलीय. यापैकी भूषण लांजेवार हा कार चालवत असल्याची माहिती समजते.