त्या हत्याकांड ने पोलीस पण हैराण!
बॉयफ्रेंडच तुकडे पाडले, मैत्रिणीच्या घरी दफन, विवाहित महिलेच्या कांडने 3 राज्याचे पोलीस हैराण
एक खळबळजनक घटना घडली आहे. एक विवाहित महिलेने असं कांड केलं, त्यामुळे तीन राज्यांचे पोलीसही हैराण झालेत. विवाहबाह्य संबंध या सगळ्याला कारण आहे. महत्त्वाच म्हणजे आरोपी महिलेने नवऱ्यालाही या गुन्ह्यात सोबत घेतलं.एका महिलेने असं कांड केलं, त्यामुळे 3 राज्याचे पोलीसही हैराण झालेत. महिलेने पतीच्या साथीने मिळून प्रियकराची हत्या केली. त्यानंतर मृतदेह मैत्रिणीच्या घरी दफन केला. मृत व्यक्ती बिहारचा राहणार होता, जेव्हा काही दिवस त्याच्याबद्दल काहीच समजलं नाही, तेव्हा घरातल्यांनी बिहार पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर हादरवून टाकणार हत्याकांड समोर आलं. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील हे प्रकरण आहे. फतनपुर पोलीस ठाणे क्षेत्रातील सुवंसा गावच हे प्रकरण आहे. या गावात राहणारे विनोद आणि त्याची पत्नी पुष्पा हरियाणा गुरुग्राम येथील एका प्रायवेट कंपनीत काम करते.पुष्पाच बिहारच्या शिवनाथसोबत (45) प्रेम प्रकरण सुरु झालं. पण लवकरच ती शिवनाथला कंटाळली. शिवनाथपासून तिला सुटका हवी होती. पण शिवनाथ हे नातं संपवायला तयार नव्हता. महिलेने त्यानंतर नवरा विनोदला सर्व सांगितलं. त्यानंतर नवरा-बायको दोघांनी मिळून प्लान बनवला. एक महिन्यापूर्वी पुष्पा कंपनीतून सुट्टी घेऊन आपल्या मूळगाव सुवंसा येथे आली.तिने प्रियकर शिवनाथला गावी बोलवून घेतलं. प्रेयसीने बोलवल्यानंतर शिवनाथ लगेच तयार झाला. पण त्याला हे माहित नव्हतं की, त्याच्यासोबत पुढे काय होणार आहे. पुष्पाने मैत्रीण पूनमला सुद्धा घरी बोलावलं. तिथे आधीपासून पुष्पाचा नवरा, पूनम आणि तिचा नवरा चिंतामणी हजर होते. शिवनाथ पुष्पाच्या घरी येताच त्याची गळा घोटून हत्या केली. मृतदेहाचे धारदार हत्याराने तीन तुकडे केले व पूनमच्या घरातच मृतदेहाच दफन केलं.
गुन्ह्याची उकल कशी झाली?
त्यानंतर विनोद आणि पुष्पा गुरुग्रामला निघून गेले. बिहार पोलीस शिवनाथचा शोध घेत होती. तो पुष्पाच्या नियमित संपर्कात असल्याच पोलिसांना समजलं. शेवटच बोलण सुद्धा तिच्याशीच झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी पुष्पाला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरु केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच पुष्पा भळाभळा सर्व बोलून गेली. अशा प्रकारे भयानक हत्याकांडाची उकल झाली.