अमरावतीत सिटी बसने चौघांना चिरडले

अमरावतीत जनतेचा उद्रेक

९ वर्षाच्या चिमुकल्याचा मुत्यु

अमरावती शहरात सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघतात एका ९ वर्षांच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे
अमरावती शहरात सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघतात एका ९ वर्षांच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे। तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. अमरवातीच्या सायन्स कोर मैदानासमोर हा अपघात झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने उद्रेक घेतला असून बसची तोडफोड केली आहे.सदर आज सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली. बस ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला असून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव वेगात सिटी बसने चौघांना चिरडलं. या अपघातात प्रीतम गोविंद निर्मळे या ९ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर अपघातात नर्मदा निर्मळे, वैष्णवी संजय निर्मळे आणि संतोष निर्मळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या