मोठी बातमी! हावडा -मुंबई मेलचा भीषण अपघात
२ मुत्यूमुखी तर २० जखमी असल्याची माहिती?
घटनास्थळी बचाव कार्याला सुरुवात
झारखंडच्या टाटानगरजवळ मंगळवारी भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. हावडा- मुंबई मेलला अपघात झाला आहे.झारखंडच्या टाटानगरजवळ मंगळवारी भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली आहे, टाटानगरजवळ चक्रधरपूरमध्ये हावडावरून मुंबईला जाणारी ट्रेन क्रमांक 12810 चे अनेक डब्बे रुळावरून घसरले. या अपघातामध्ये किती जण जखमी झाले आहेत याची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाहीये. रेल्वे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफचं पथक पोहोचलं असून, बचावकार्य सुरू झालं आहे.मिळालेल्या माहितीनुसार राजखरस्वान वेस्ट आऊटर आणि बारांबूदरम्यान एक मालगाडी रुळावरून घसरली होती. या मालगाडीच्या वॅगनन्स अजूनही रुळावरच होत्या. याचदरम्यान दुसऱ्या रुळावरून हावडावरून मुंबईला जाणारी हावडा -मुंबई मेल येत होती. त्या वॅगन्सला धडकल्यानंतर हावडा -मुंबई मेलचा भीषण अपघात झाला. अनेक डब्बे रुळावरून घसले. दरम्यान घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलं असून, या अपघातामध्ये किती जण जखमी झाले आहेत, याची माहिती अजून मिळू शकलेली नाहीये. या अपघातामध्ये अद्याप तरी कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाहीये.
दरम्यान या अपघातानंतर रेल्वे विभागाच्या वतीनं हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. टाटानगरमध्ये 06572290324, चक्रधरपूर 06587 238072, राउरकेला 06612501072, 06612500244 आणि हावडासाठी 9433357920, 03326382217 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करण्याचं आवाहन रेल्वेच्या वतीनं करण्यात आलं आहे.