मोठी बातमी!
नागपूरमध्ये सिमेंट वीट कारखान्यात भीषण स्फोट
नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे, नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील एका वीट कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे,
या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 5-6 जण जखमी झाले आहेत, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.मौदा तालुक्यातील सिमेंट विट कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे, या घटनेत एकाचा मृत्यू तर पाच ते सहा जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले, स्फोटाबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.