महाराष्ट्रातील 41 पर्यटकांच्या बसचा नेपाळमध्ये अपघात, 14 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील 41 पर्यटकांच्या बसचा नेपाळमध्ये अपघात, 14 जणांचा मृत्यू
नेपाळमध्ये बस नदीत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत १४ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय.जळगाव : नेपाळला पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील 41 जणांच्या बसचा भीषण अपघता झाला. बस नदीत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत १४ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील भाविकांचा समावेशअसल्याची माहिती समोर आलीय. मंत्री अनिल पाटील यांनी माहिती देताना म्हटलं की, तासाभरापूर्वी मला ही माहिती मिळालेली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी यांच्याशी मी तात्काळ संपर्क केला आहे. – 41 भाविक दर्शनासाठी गेले होते आणि ती बस आता नदीमध्ये कोसळलेली आहे अशी प्राथमिक माहिती आहे.अंदाजे 15 ते 16 मृतदेह सापडले असल्याचंही सांगण्यात आलं आहे.पोखराहून काठमांडूला निघालेल्या पर्यटकांची बस मुखलिसपूरजवळ दरीत कोसळली. गोरफूरच्या केसरवानी ट्रॅव्हल्समध्ये महाराष्ट्रातील ४१ प्रवासी होते. गोरखपूरच्या चालकासह १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रयागराज रेल्वे स्थानकाहून महाराष्ट्रातील ११० पर्यटकांचा ग्रुप चित्रकूटला गेला. तिथून अयोध्या, लुम्बिनी मार्गे ते नेपाळच्या पोखरा इथं पोहोचले. आज ते काठमांडूला निघाले होते.नदीत कोसळून बसचा पुरता चक्काचूर झाला होता. बसच्या वरचं छत उडालं होतं, पुढच्या भागाचा सांगाडा वेगळा झाला होता. काहीजण वेदनेनं विव्हळत होते, वाचवण्यासाठी याचना करत होते.नदीजवळच्या खडकावर मृतदेहांचा खच पडला होता. रक्तानं दगड माखले होते. जखमींचा आक्रोश होता. मन सुन्न करणारे अपघाताचे फोटो समोर आले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या