कारची ट्रकला मागून भीषण धडक, 7 जणांचा जागीच मृत्यू;
कटरनं कापून बाहेर काढले मृतदेह
कार मागून एका ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून 7 जण जागीच ठार झाले.
अहमदाबाद : गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात भीषण अपघात झालाय. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. कारमधील लोक श्यामला जी मंदिरात दर्शन करून अहमदाबादला परतत होते. त्यावेळी त्यांची कार मागून एका ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात ७ जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.अपघातानंतर कारमधून मृतदेह बाहेर काढणं कठीण झालं होतं. कटरने कापून कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले. एकूण आठजण प्रवास करत होते. त्यातला केवळ एक जण वाचला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.