मोठी बातमी जितीया व्रत आला अंगलट ४१ मृत
बातमी जितीया व्रत आला अंगलट ४१ मृत
बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी देशभरात जितिया व्रत पाळण्यात आला. यावेळी महिलांनी गंगेसह विविध नद्यांमध्ये स्नानही केले. मात्र, बुधवार बिहार कालचा दिवस वाईट गेला. जितिया सणानिमित्त गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या लोकांपैकी राज्यभरात ४९ जण बुडाले, त्यापैकी ४१ जणांचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी तलावात आंघोळ करताना दोन महिला आणि सहा मुलींसह आठ जणांचा मृत्यू झाला. ही घटना जिल्ह्यातील बरुण ब्लॉकच्या इथाट गावात आणि मदनपूर ब्लॉकच्या कुशा गावात घडली.