थायलंडमध्ये बस अपघात 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू
बँकॉक : थायलंडमध्ये एका शाळेच्या बसला भीषण आग लागून 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सीएनजी बसचा टायर फुटल्यानंतर तिला आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बसमधून विद्यार्थी आणि 6 शिक्षकांसह 44 जण प्रवास करत होते. यात अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.