मोठी बातमी! अभिनेता गोविंदाला लागली गोळी
रुग्णालयात उपचार सुरू
अभिनेता गोविंदा गोळी लागून जखमी झाला आहे, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीप्रमाणे ही गोळी त्याला त्यांच्या बंदुकीमधून लागली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना आज पहाटे पाचच्या दरम्यान घडली. गोविंदाला त्याच्याच लायन्सस रिव्हॉल्वरमधून गोळी लागली आहे. गोविंदाच्या पायाला गोळी लागली. त्याला काही कामानिमित्त बाहेर जायचे होते, बाहेर जाण्याची तयारी सुरू असतानाच हा अपघात घडला आहे. या घटनेत गोविंदा जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.