5 ऑगस्टपासून अनलॉकच्या दिशेने वाटचाल; केंद्राकडून नवी नियमावली जाहीर!

दिल्ली | कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम अनलॉकमध्ये टप्प्या टप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक 3 साठी नियमावली जारी केल्या आहेत.

1 ऑगस्टपासून रात्रभर असलेला कर्फ्यू बंद होणार आहे. तसंच 5 ऑगस्टपासून जिम सुरू कऱण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, शाळा-कॉलेज 31 ऑगस्पर्यंत बंदच राहतील. मेट्रो, थिएटर, स्विमिंग पूल बाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही.
कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारे सूट दिली जाणार नाही. सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. गर्दी करण्यास सक्त मनाई असेल.

स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सुरक्षेची काळजी घेऊनच परवानगी दिली आहे. कन्टेंन्मेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन लागू राहील. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियमावलीनुसार कंटेन्मेंट झोनचा निर्णय जिल्हा प्रशासन घेईल. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक आहे. गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनाला परवानगी नाही. तसंच वैवाहिक कार्यक्रमांमध्ये 50 पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही. तसंच अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त लोक असू नयेत असंही यामध्ये सांगण्यात आलं आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या