शिंदे, अजितदादा गटाला किती जागा देणार?

देवेंद्र फडणवीस यांचा फॉर्म्युला काय?
आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये जागावाटप हे कशाप्रकारे होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही जागांवरून दोस्तीत कुस्ती होण्याचीही शक्यता आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीआधी महायुती आणि मविआच्या जागावाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता राज्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिन्ही बडे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती मोठ्या ताकदीने उतरेल मात्र शिंदेंच्या शिवसेनेला, पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार याबाबत लोकसभा महासंग्राम या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले जाणून घ्या.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आम्ही तिघं एकत्र बसतोय, तत्त्व एकच ठरवलं. जागांचं जास्त अडून धरायचं नाही. जो निवडून येईल त्याने लढवायचं. त्यामुळे तिघांसोबत न्याय होईल. संख्येसाठी लढत नाही. मोदींच्या पाठी महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. कुणाला किती जागा मिळते, कोण तिथे निवडून येईल या गोष्टी गौण आहे. भाजप कमळावर, शिंदे धनुष्यबाण आणि अजितदादा घडाळ्यावरच लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या