भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, वृद्ध महिला ठार
नागपुरातील घटना
एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर काही ८ ते १० महिला जखमी झाल्या.
नागपूर भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात नियोजन बिघडल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर काही ८ ते १० महिला जखमी झाल्या. ही घटना आज शनिवारी सकाळी अकरा वाजता शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात घडली. मनूबाई तुळशीराम राजपूत (६५, आशीर्वादनगर) असे मृतक महिलेचे नाव आहे. भाजपतर्फे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबीर आयोजित करण्यात करण्यात आले आहे.