आठ महिने धरणाच्या पाण्यात राहणारे महादेव!
महाराष्ट्रातील एकमेक मंदिर जे तब्बल 8 महिने धरणाखाली बुडालेले असते; फक्त 4 होते महादेवाचे दर्शन
महाराष्ट्रात एक असं अनोखं मंदिर आहे जे वर्षातील 8 महिने धरणाखाली बुडालेले असते. वर्षातून फक्त 4 महिनेच महादेवाचे दर्शन होते.या मंदिराचा थेट छत्रपती शिवरायांशीही संबध आहे. महाराजांनी कोकण-सिंधुदुर्गची मोहिम फत्ते केल्यानंतर ते वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. वाघेश्वर मंदिर 700 ते 800 वर्ष जुनं आहे. संपूर्ण मंदिर दगडांनी बनवलं आहे. हेमाडपंथी शैलीत असेलेल वाघेश्वर मंदिर पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. पावसाळा आणि त्यांनतरचे काही महिने असं मिळून हे मंदिर 8 महिने पाण्याखाली असते. साधारण मार्च महिन्यात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे मंदिर पाण्याबाहेर येते.
1965 मध्ये पावना धरण बांधण्यात आले. 191 मध्ये धरणाचा वापर होण्यास सुरुवात झाली. यानंतर हे मंदिर पाण्याखाली बुडाले. पवना धरणाच्या पाण्यात असलेले वाघेश्वर मंदिर तब्बल 8 महिले पाण्याखाली असते. वर्षातून फक्त 4 महिनेच हे मंदिर पाण्याबाहेर असते.
पुण्यातील वाघोली येथे हे वाघेश्वर मंदिर आहे. महादेवाच्या दर्शनासाठी भाविक प्रतिक्षा करत असतात.