सर्वात मोठी कारवाई!
मुंबई क्राईम ब्रांचची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तब्बल 232 कोटी 28 लाखांचे ड्रग्ज हस्तगत
मुंबई क्राईम ब्रांचने मोठ्या ड्र्ग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल 232 कोटी 28 लाखांचे ड्रग्ज हस्तगत केले आहेत
मुंबई क्राईम ब्रांचने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. मुंबईतून तब्बल 232 कोटी 28 लाखांचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेने मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 चहा पथकाने ही करावाई केली आहे. एकूण 252 कोटी 28 लाख किमतीचे एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहे. यामध्ये एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यात एक महिलेचा देखील समावेश आहे. एक महिला आणि पुरुष याला कुर्ला येथून अटक करण्यात आले होते व त्यांच्याकडून काही प्रमाणात एमडी चा साठा जप्त करण्यात आला होता.