रमजान च्या महिन्यात अख्या कुटुंबावर काळाचा घाला
रमजानच्या महिन्यात अख्खं कुटुंब जळून कोळसा, 2 वर्षांच्या चिमुरड्यांचा समावेश, काळीज पिळवटून टाकणारे
(छत्रपती संभाजीनगर) : रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील छावणी कॅन्टोन्मेंट परिसरातील तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
छावणी परिसरात जैन मंदीराजवळ ही घटना घडली असून एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री तीन वाजेदरम्यान ही घटना घडली असून घटनास्थळी बचाव कार्यासाठी कॅन्टोन्मेंट अधिकारी, कर्मचारी आणि छावणी पोलीस दाखल झाले
यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला. एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन बालक, तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. आग कशामुळे लागली हे पण पोलीस तपासात समोर येईल.
मृतदेह घाटी रुग्णालयात एम्बूलन्सने पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र आग कशामुळे लागली याची माहिती पोलिसांनी अजूनपर्यंत दिलेली नाही. आगीचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही.स्थानिकांच्या माहितीनुसार बाहेर इलेक्ट्रिक गाडी चार्जिंगला लावलेली होती आणि त्या गाडीमध्ये स्फोट झाला, त्यानंतर दुकानाला आग लागली. साडेतीन वाजेच्या सुमारास आग लागली तेव्हा अग्निशामन दलाला माहिती देण्यात आली. मात्र अग्निशमन दल आणि पोलीस योग्य वेळेस पोहचू शकले नसल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय.आगीच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये २ चिमुकल्यांसह, दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. आसिम वसीम शेख, (3 वर्ष), परी वसीम शेख (2 वर्ष), वसीम शेख (30 वर्ष), तन्वीर वसीम (23 वर्ष) हमीदा बेगम (50 वर्ष), शेख सोहेल (35 वर्ष) रेश्मा शेख (22 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.वरच्या मजल्यावर झोपलेल्यांना खाली काय घडलंय त्याची कल्पना नव्हती. लहान मुलं आणि महिला होत्या. त्यांना समजेपर्यंत धूर पसरला होता. त्यातच त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.टेलरच्या दुकानाला ही आग लागली. तर वरच्या दोन मजल्यावर राहणाऱ्या ७ जणांचा यात गुदमरून मृत्यू झाला. इमारतीवर दोन मजले असून या कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. कपडे आणि सोफा होता त्याला आग लागली. त्याचा धूर वरच्या मजल्यावर गेला. घरात अडकलेल्यांना बाहेर पडता आलं नाही.