पोकलेन ने रेती उपस्याच्या तक्रारीला जिल्हाधिकाऱ्यांनीही दाखविली केराची टोपली ?
जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याचे हातावर घडी तोडांवर बोट?
अवैध उत्खननात पर्यावरण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांची ऐसीतैशी
ग्रामपंचायत ने केलेल्या १३ मार्च च्या तक्रारीवर कारवाई शून्य
सरपंच उपसरपंचाचा आमरण उपोषणाचा इशारा !
तालुका प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे: धामणगांव रेल्वे तालूकक्यात राजरोसपणे पोकलेन द्वारे सुरु असलेल्या रेती उपस्याबाबत तालूक्यातील महसुल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे वारंवार केलेल्या तक्रारीनंतर लक्षात आल्यावर थेट जिल्हाधिकाऱ्याकडे गोकुळसरा सरपंच व उपसरपंचासह गावकऱ्यांनी १३ मार्च २४ रोजी लेखी तक्रार केली मात्र सदर तक्रारीस जवळपास एक महिन्याचा कालावधी होत असतांना ही कोरतीही कारवाई झाली नसल्याने कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रशनचिन्ह निर्माण झाले आहे. एकंदरीत सदर तक्रारीची माहिती मा.जिल्हाधिकाऱ्यांना झालीच नाही की त्यांच्यापासुन लपवुन ठेवली याची चौकशी होणे गरजेचे असतांना गोकुळसरा येथील सरपंचांनी मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
धामणगांव रेल्वे तालूक्यात पोकलेनच्या सहाय्याने होत असलेल्वा रेती उपस्याच्या संदर्भात तहसीलदारांना कळविले त्यांच्याकडून कारवाई होत नसल्यने उपविभाग चांदुर रेल्वे येथे सुध्दा तक्रार दिली. शेवटी तक्रारीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत कुणीच ऐकत नाही हे लक्षात आल्यावर थेट जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे दि १३ मार्च२४ रोजी लेखी तक्रार गोकुळसरा येथील सरपंच उपसरपंच व सचिव यांच्या सह गावकऱ्यांच्या सह्यांनिशी दिली आहे. सदर तकारीस तीन आठवड्याचा कालावधी उलटूनसुध्दा अगदी काल परवा पर्यंत राजरोपणे पोकलेनने उत्खनन सुरुच असल्याने शेवटी दाद कुणाकडे मागायची ? असा प्रश्न गोकुळसरा गावकऱ्यांना पडला असुन आता जर कारवाई झाली नाही तर थेट उपोषणाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
—————————————————————-
१ महिन्यापुर्वी या विभागात केल्या तक्रारी !
१) जिल्हा खनिकर्म अधिकारी, अमरावती
२) जिल्हा पोलीस अधिक्षक, अमरावती
३) मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती
४) उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे
५) तहसीलदार धामणगांव रेल्वे
—————————————————————-
……..अन्यथा करणार आमरण उपोषण : रमेश ठाकरे , सरपंच गोकुळसरा
एक महिन्यापासुन सर्वच विभागात तक्रारी दिल्या पण एकाही विभागाने दकल घेतली उलट उपसरपंच ग्रामपंचायत सचिव, कर्मचारी पाहणी करण्याकरीता घाटात गेले तर घाटमालक जीवे मारण्याची धमकी देतात तुम्ही घाटात कसे आलात ? निगा बाहेर अश्या प्रकारे दमदाटी करतात. आमच्या गावाच्या हद्दीतील नदीपात्रात अवैध उत्खनन सुरु असतांना आम्लाच चोर ठरविण्याचा प्रकार असुन या संपूर्ण प्रकारास महसुल विभागाचे समर्थन आहे. आमच्या मागण्यांवर कारवाई करुन पोकलेन सुरु असलेला उपसा थांबविला नाही तर नाईलाजाचे आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असे सरपंच रमेश ठाकरे यांनी सांगितले आहे.
————————————————————-
अवैध उत्खननात पर्यावरण नियंत्रण मानकांची ‘ऐसीतैशी‘
महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन अधिनियमांतर्गत रेथी घाट उपसा करतांना पर्यावरण निंयंत्रण मंडळाने काही मानके घालून दिले आहेत त्या नुसार कोणत्याही नदीपात्रात १ मीटरपेक्षा खोल खड्डे करु नयेत असे स्पष्ट निर्देश आहेत मात्र गोकुळसरा शासकीय रेती डेपो घाटातील नदीपात्रात ४०-४० फुटांचे अनेक खडडे करुन ठेवले आहेत
————————————————————-