सोलापुरात भीषण अपघात; कारने दुचाकीला उडवलं
शिक्षकाचा जागीच मृत्यू
सोलापूरमध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये शिक्षकाचा मृत्यू झाला.सोलापूरमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कारनं दुचाकीला उडवलं, या अपघातामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर हा अपघात झाला आहे. हरी जगताप असं या शिक्षकाचं नाव आहे. ते मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.सोलापूरमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कारनं दुचाकीला उडवलं, या अपघातामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर हा अपघात झाला आहे. हरी जगताप असं या शिक्षकाचं नाव आहे. ते मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर मोहोळ तालुक्यातील कामती परिसरात असलेल्या वाघोली पुलावर भीषण अपघात झाला. भरधाव कारनं दुचाकीला उडवलं. या अपघातामध्ये शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. हरी जगताप असं या शिक्षकाचं नाव आहे. ते या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले होते, गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षकम्हणून कार्यरत होते.