उष्माघातामुळे ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातील पहिला बळी
नांदेडमधील तापमान 41 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं आहे. या कडक उन्हामुळे नांदेडमध्ये पहिला बळी गेला आहे. नांदेडमध्ये उष्माघातामुळे ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.राज्यभरातील सर्व जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. या कडक उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत. तर नांदेडमधील तापमान 41 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं आहे. या कडक उन्हामुळे नांदेडमध्ये पहिला बळी गेला आहे. नांदेडमध्ये उष्माघातामुळे ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.नांदेड जिल्ह्यातील वाढत्या तापमानाने पहिला बळी घेतला आहे. नांदेड जिल्ह्याचे तापमान 41 डिग्री सेल्सिअसच्या वर पोहचले आहे. यामुळे उन्हामुळे नांदेडमधील परमेश्वर सुरजवाड या तरुणाचा मृत्यू झाला आहे