मुलींना ड्रग्जचं इजेक्शन देऊन केले अत्याचार
दोघांना अटक एक फरार, पुणे हादरलं
जिल्ह्यातून हादरवणारी घटना समोर आली आहे, दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्जचं इंजेक्शन देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील राजगुरुनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या तसेच अत्याचार करणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार पुण्याच्या राजगुरुनगर शहरात दोन मुलींना ड्रग्जचे इंजेक्शन देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. या मुलींना ड्रग्जसोबत मद्य देखील पाजण्यात आले. त्यानंतर लॉजवर त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला. अत्याचार करण्यात आलेल्या दोन्ही मुली या अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.शहरात घडलेल्या या भयानक प्रकाराणे राजगुरुनगर हादरलं आहे. ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या आणि अत्याचार करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक फरार झाला आहे. पीडित मुली नशेत घरी पोहोचल्यानंतर ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात आली, त्यानंतर या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटने प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.