किंकाळ्या, आरडाओरड आणि हाहा:कार, भयानक अपघात, 17 मजुरांचा जागीच मृत्यू
पिकअपचं नियंत्रण सुटल्याने भीषणअपघाताची घटना घडली. ही पिकअप थेट 20 फूट खोल दरीत जावून कोसळली. या पिकअपमध्ये तब्बल 40 पेक्षा जास्त मजूर होते. अपघात इतका भीषण आहे की, तब्बल 17 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 20 पेक्षा जास्त जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे मृतांच्या नातेवाईकांनी टाहो फोडलाय. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड किंकाळ्या, आरडाओरड ऐकू आल्या आणि हाहा:कार माजला. या अपघातामुळे संपूर्ण देश सुन्न झालाय.छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यातील सुन्न करणारी घटना घडली आहे. कवर्धा जिल्ह्यातील बाहपानी परिसरात अपघाताची मोठी घटना घडली. या परिसरात पिकअप वाहन 20 फूट दरीत कोसळल्याने 17 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे छत्तीसगडसह संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात होती. पिकअपमधून प्रवास करणारे मजूर हे तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेले होते. या मजुरांची संख्या जवळपास 40 इतकी होती. हे सर्व मजूर तेंदुपत्ता तोडण्याचं काम आटोपून आपल्या घराकडे निघाले होते. ते पिकअप गाडीतून घरी जात होते. पण याच पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला. पिकअपचं नियंत्रण सुटल्याने ही पिकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या 20 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात तब्बल 17 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण कवर्धा जिल्हा सुन्न झाला आहे.सध्या तेंदु पत्ता संकलन हंगाम सुरू आहे. हे सर्व मजूर तेंदुपान संकलन करून परत येत होते. याच दरम्यान संबंधित घटना घडली. कुकदुर पोलीस ठाणे अंतर्गत बाहपानी डोंगराळ भागातून पिकअप वाहन जात होतं. याचदरम्याने चालकाचा पिकअपवरील ताबा सुटला आणि ही गाडी दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं आणि पिकअपखाली दबलेल्या मजुरांना कसंतरी बाहेर काढलं. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये कामगार पिकअपजवळ पडलेले दिसत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कामगार आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पिकअपमध्ये जंगलातून तेंदूपत्ता तोडून परतत होते. पिकअपमध्ये सुमारे 40 मजूर होते. दरम्यान, वाटेत पिकअपचे नियंत्रण सुटले आणि 20 फूट खोल दरीत पडली. या अपघातात 17 मजुरांचा चिरडून मृत्यू झाला. तर 20 हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले आहेत.