वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग २०२७ पर्यंत पूर्ण होणार!
बहुप्रतिक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गाचे काम २०२७ पर्यत पुर्ण होईल अशी माहिती मध्ये रेल्वेचे महाप्रबंधक रामकरण यादव यांनी दिली. मुंबई येथे दि. १ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वे विभाग व प्रादेशिक रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्यांची १२५ वी बैठक संपन्न झाली. या बैठकीत ही माहिती देण्यात आली. या बैठकीला उमरखेड येथील उद्योजक व मध्यरेल्वे च्या सल्लागार समितीचे सदस्य विनोद जैन यांची उपस्थित होते.
दि 1 ऑगस्ट रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे मध्य रेल्वेची बैठक पार पडली. रेल्वेचे महाप्रबंधक रामकरण यादव व उपमहाप्रबंधक अभय मिश्रा यांच्या उपस्थीतीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये वर्धा- यवतमाळ- नांदेड या रेल्वे लाईन संदर्भात बराच वेळ चर्चा झाली.
त्या दरम्यान विनोद कुमार जैन यांनी सदर रेल्वेमार्ग कधी पुर्ण होणार? अशी विचारणा केली. तेव्हा यादव यांनी सदर प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले. प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे काम संपुष्टात आले असून, रेल्वे मार्गाच्या माती करण व अस्तारीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. सध्या वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वे मार्ग पुर्णत्वास आला आहे अशी माहिती देण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य विनोदकुमार जैन यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.