आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार
आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार
l राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे. या योजनेला राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद येत आहे. यो योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना तब्बल 3000 रुपये राज्य सरकारच्यावतीने दिले जाणार आहेत. अशातच आता या योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.
या तारखेला जमा होणार पहिला हप्ता :
राज्यभरातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद येत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले आहेत. मात्र अद्यापही या योजनेचे अर्ज भरण्याचे काम जोमाने सुरु आहे.
राज्य सरकारने या योजनेची अंतिम मुदत ही 15 ऑगस्ट दिली होती, मात्र ती मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. राज्यातील महिला 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिण योजनेचा अर्ज करू शकतात. अशातच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी आणखी एक गुडन्यूज दिली आहे. या योजनेचा पहिला हप्ता हा 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच 3000 रुपये ओवाळणी म्हणून मिळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.