मतदारसंघाचा विकास म्हणजे आमदार प्रतापदादा अडसड
धामणगाव मतदारसंघातील ओकनाथ धामणगाव रेल्वे येथील 1 कोटी 20 लक्ष रुपयांच्या शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पांदण रस्त्यांचे व विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न आज संपन्न करण्यात आले.
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नातून ओकनाथ तालुका धामणगाव रेल्वे येथे विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा डॉ.अर्चनाताई अडसड रोठे आक्का यांच्या उपस्थितीत व गावातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी बांधव, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या हस्ते संपन्न झाला,सुरेंद्र हलमारे ते विटाळा देवगाव रोड पर्यंत पांदणरस्ता खडीकरण करणे किंमत 20 लक्ष रुपये
सुरेंद्र हलणारे ते शब्बीर धामीया यांच्या शेतापर्यंत पांदण करणे किंमत 20 लक्ष रुपये,
उत्तमराव हामसोंगे ते नरेश कांबळे यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता करणे किंमत 20 लक्ष रुपये,
नरेश कांबळे बोरगाव धांदे पांदण रस्ता खडीकरण करणे किंमत 20 लक्ष रुपये,
उत्तमराव हामसोंगे ते रामदास गवारले पांदण रस्ता खडीकरण करणे किंमत 20 लक्ष रुपये,
शब्बीर धामिया ते सत्यम शॉप पांदण रस्ता खडीकरण करणे किंमत 20 लक्ष रुपये, लाखोंचे भूमिपूजन आज जनतेच्या मोठया उपस्थित संपन्न करण्यात आले असून भविष्यात ही आमदार प्रतापदादा अडसड हेच धामणगाव मतदारसंघाचे विकास व परिवर्तन घडवून आणू शकतात असा विश्वास ही स्थानीय नागरिकांनी वैक्त केला आहे.