अंजनगाव सुर्जी शहरातून साडे तीन किलो गांजा जप्त

प्रतिनिधी मुबीन शेख
दि.२२. फेब्रुवारी २०२४

*स्थानिक गुन्हे शाखा व अंजनगाव सुर्जी पोलिसांची संयुक्त कार्यवाही*

अंजनगाव सुर्जी.अमरावती जिल्हयाचे पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी जिल्हयात अवैधरित्या विनापरवाना मादक अमली पदार्थ गांजा बाळगणा-या विरुध्द कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत
त्या अनुषंगाने दिनांक २१/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असता
गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, अंजनगाव सुर्जी येथील आरोपी गोपाल उत्तमराव फुसे वय ३७ वर्ष राहणार माळीपुरा अंजनगाव सुर्जी हा अवैधरित्या विक्री
करण्याचे उददेशाने गांजा अमली पदार्थ घेवुन येत आहे
प्राप्त माहितीची शहानिशा करुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे राजपत्रित अधिकारी, पंच व पोलीस स्टाप सह अंजनगाव सुर्जी ते आकोट रोडवर कचरा डेपो समोर सापळा रचुन सदर आरोपीस ताब्यात घेवुन झडती घेतली असता त्याचे जवळ असलेल्या बॅग मध्ये ३ किं. ५०९ ग्रॅ. मादक अमली पदार्थ गांजा किं. ५२,५०० रुपये तसेच एक बॅग किं. १००० रुपये मोबाईल ५०० रुपये असा एकुण ५४,००० रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला
आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे कलम २० (ब) (II) ८ (सी) एन.डी.पी.एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, यास पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चे पोलीस निरीक्षक किरण वानखडे अंजनगाव सुर्जी येथील ठाणेदार प्रकाश अहिरे, यांचे नेतृत्वात, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, अंमलदार त्रंबक मनोहर, सुनिल महात्मे, सुधिर बावने, सैयद अजमत, निलेश डांगोरे, दिनेश कनोजिया, सागर धापड, रितेश वानखडे, चालक संजय गेठे, पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथील जयसिंग चव्हाण, शुभम मारकंड, यांनी केली.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या