बदलापूर कांड चा आरोपी अक्षय शिंदे याचा मुत्यु!
अक्षय शिंदेचा गेम कसा झाला? अखेरच्या १० मिनिटात काय घडलं?
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस झटापटीमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदे याने बदलापूरच्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. काही दिवसांपूर्वीच अक्षय शिंदे याने वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचार केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात आरोप पत्र देखील दाखल केलं होतं. अशातच आता आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.पोलीस बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कारागृहातून पोलीस ठाण्यातून ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यानं एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली. त्यानंतर अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या फायर केल्या. त्यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायात लागली. तर 2 गोळ्यांचा फायर चुकल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर निलेश मोरे यांनी जखमी अवस्थेत अक्षयवर हल्ला केला.
सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरांक्षणासाठी गोळीबार केला. त्यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या. यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली. त्यानंतर दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलीसांनी नेलं गेलं. या घटनेनंतर अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. तर पोलीसांनी मात्र अद्याप दुजोरा दिला नाही.