चौकाचौकात मधमाशांचे गोंधळ!

नागरिकांची धावपळ

दहा ते तेरा  जण जखमी, विद्यार्थ्यांवरही हल्‍ला

अमरावती:-
पाण्‍याचे बिल भरण्‍यासाठी आलेल्‍या नागरिकांसह परिसरातील विद्यार्थ्‍यांवर मधमाशांनी हल्‍ला केल्‍याने दहा ते बारा जण जखमी झाले असून एका अपंग व्‍यक्‍तीसह दोघांची प्रकृती चिंताजनक असल्‍याचे सांगण्‍यात येते. ही घटना चांदूर बाजार येथे गुरुवारी दुपारी घडली.
अमरावती : पाण्‍याचे बिल भरण्‍यासाठी आलेल्‍या नागरिकांसह परिसरातील विद्यार्थ्‍यांवर मधमाशांनी हल्‍ला केल्‍याने दहा ते बारा जण जखमी झाले असून एका अपंग व्‍यक्‍तीसह दोघांची प्रकृती चिंताजनक असल्‍याचे सांगण्‍यात येते. ही घटना चांदूर बाजार येथे गुरुवारी दुपारी घडली. कमलाकर आसोलकर (५०) आणि नयन उके (२५) दोघेही रा. चांदूरबाजार अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्‍यांना सुरुवातीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कमलाकर आसोलकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *