पार्टी करणे पडले महागात ३ लाख उडविले

बँकेचे अध्यक्ष पार्टीत गुंग एका चालकाने साडेतीन लाख लंपास

यवतमाळ येथील शेतकऱ्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका बँकेच्या अध्यक्षांच्या वाहनातून चक्क साडेतीन लाख रूपयांची रोकड उडविण्यात आली.
यवतमाळ : येथील शेतकऱ्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मर्जीतील काही अधिकारी नेहमीच्या पार्टीत दंग असताना बँकेच्या अध्यक्षांच्या वाहनातून चक्क साडेतीन लाख रूपयांची रोकड उडविण्यात आली. या घटनेने बँकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली. प्रतिष्ठा जपण्यासाठी पोलिसांत लेखी तक्रार देण्यात आली नाही. मात्र पोलिसांची मदत घेवून चोराला शोधण्यात यश आले. बँकेच्या उपाध्याक्षांच्या वाहनावरील माजी चालकाने ही रक्कम लंपास केल्याचे उघड झाले.

शेतकऱ्यांची ही बँक गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. कधी नोकर भरती तर कधी शाखांमधील अफरातफर यामुळे बँक कायम चर्चेत असते. आता पार्टीतून अध्यक्षांच्याच वाहनातील रोकड लंपास झाल्याने बँक चर्चेत आली. यवतमाळ शहरानजीक लोहारा परिसरात बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व काही अधिकारी नेहमीप्रमाणे पार्टीसाठी गेले. बँकेचे संचालक, अधिकाऱ्यांच्या पार्ट्या नित्यानोच्या झाल्या आहेत. लोहारा परिसरात रंगलेल्या या पार्टीत ‘खेळ’ रंगला. या खेळात होणारी उलाढाल चर्चेचा विषय असते. पार्टीत खेळ चालत असल्याने येथे येणाऱ्या संचालकांच्या वाहनात नेहमीच रोकड असते. याची माहिती वाहन चालकांनाही असते. हीच बाब हेरून त्या दिवशी अध्यक्ष, उपाध्यक्ष व अधिकारी पार्टीत रमल्याचे बघून एका चालकाने अध्यक्षांच्या वाहनातील रक्कम लंपास केली. उपाध्यक्षांच्या वाहनावरील माजी चालकाने अध्यक्षांच्या वाहनाचे काच फोडून रक्कम लंपास केली. अध्यक्ष पार्टीहून परत आल्यानंतर त्यांना वाहनाची काच फुटलेली दिसली. वाहनात ठेवलेली रोकडही लंपास झाल्याचे आढळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *