अवैध गोवंश वाहतुकीवर ब्राह्मणवाडा थडी पोलिसांची धडक कार्यवाही
प्रतिनिधी मुबीन शेख
दि. २३/०२/२०२४
*आरोपीसह २ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*
ब्राह्मणवाडा थडी .अमरावती ग्रामिण जिल्हयातील पोलीस स्टेशन ब्राम्हणवाडा थडी येथे दि. २२/०२/२०२४ रोजी आरोपी विरूध्द अपराध क्रमांक ९४/२३ कलम ५ (अ ),५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधि १९७६, ११(१)(ड), ११ (१) (फ) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. असुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
दि. २२/०२/२०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, एक टाटा एस मध्ये अवैध गोवंश वाहतूक करून घाटलाडकी वरून चांदुरबाजार कडे जाणार आहे अशा माहितीवरून घाटलाडकी फाटयावर सापळा लावुन कारवाई केली असता आरोपी अब्दुल मुजम्मिल अब्दुल रऊफ वय २७ वर्ष रा. घाटलाडकी व दिलदार खान तुकडू खान वय ४० वर्ष रा. काजीपुरा चांदूरबाजार यांच्या ताब्यातुन एक टाटा एस क्रमांक एम.एच १४ डि. एम २२६३ मध्ये चार गौवंश ज्यामध्ये एक गाय व तिन गोहरे पांढ-या काळया रंगाचे किंम्मत ३७०००/- रू व टाटा एस वाहन किंमत २,५०,०००/- रू असा एकुन २८७०००/- रू चे कत्तलीकरीता विक्री करण्याच्या उददेशाने ताब्यात बाळगुन वाहनामध्ये वाहतुक मिळुन आले, वरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही . विशाल आनंद, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण, पंकज कुमावत अप्पर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण, अतुलकुमार नवगीरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपुर यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक उल्हास राठोड ठाणेदार पो.स्टे. ब्राम्हणवाडा थडी, पोलीस उपनिरीक्षक निलेश दाभेराव, शेषराव कोकरे, राजु मरसकोल्हे, अनुप मानकर, अकुश पायघन, चालक शरद जनबंधु पो.स्टे. ब्राम्हणवाडा थडी यांनी केली.