रेती घाटावर अंदाधुंद फायरिंग; मुख्य आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
पुसद (Yavatmal) : महागाव तालुक्यातील मौजे-भोसा येथे रेती घाटावर आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी व त्याचे इतर २० ते २५ सहकारी हे तिन गाडयासह रेती घाटावर येवून रेती घाटचा रस्ता वापरण्याचे कारणावरुन (Yavatmal crime) शिवीगाळी, धमकी देत असतांना त्याला साक्षीदार यांनी विरोध केला. त्याचा राग धरुन फिर्यादी व साक्षीदार यांना जिवेमारण्याचे उददेशाने गावठी कटटया मधून अंधाधुंद फायरिंग करुन रेती घाटावर दहशत निर्माण करुन तेथील गाडयाची तोडफोड करुन पळून गेले होते. याप्रकरणी (Yavatmal police) महागांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि.३० मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेत असतांना मुख्य फरार आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी हा पुसद विधानसभा मतदारसंघातील कासोळा ते काळी (दौ) रोडवरील मोरवाडी फाटा परिसरात दबा धरुन असल्याबाबत गोपनिय माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी (Yavatmal police) पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ आरोपी जेरबंद करण्यासाठी कासोळा व काळी (दौ) परिसरात धाव घेतली. कासोळा ते काळी (दौ) रस्त्यावरील मोरवाडी फाटा परिसरात मुख्य आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी वय 21 वर्षे, हा सापडला त्याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.
पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी बनावटीची पिस्टल (कटटा) सापडला. सदरचा या देशी कटटयामधून भोसा रेती घाटावर फायरिंग केली असल्याचे त्याने सांगितल्याने मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेवून पुढील कारवाईकरिता मुख्य आरोपीला महागाव पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात (Yavatmal police) पोनि आधारसिंग सोनोने स्थागुशा यवतमाळ, सपोनि, गजानन गजभारे, स्वागुशा यवतमाळ, पोउपनिरी/शरद लोहकरे, चापोउपनि रेवन जागृत, चापोउपनिरी रविंद्र श्रीरामे, पोहवा तेजाब रंणखांब, पोहवा/ सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि मोहम्मद ताज, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, यांनी यशस्वीरित्या पार पाडली.