नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबाबत मोठी बातमी
सुप्रीम कोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी समोर येत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांचा निवडणूकलढवण्याचा मार्ग या निर्णयामुळे आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं म्हटलं होतं. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर शिक्कामोर्तब (Sc on Caste Certificate Of Amravati Mp Navneet Rana) केलं आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं म्हटलं होतं. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर शिक्कामोर्तब केलं आहे.