लग्नाच्या पहिल्याच रात्री शक्तीवर्धक गोळ्या खाऊन पती बनला हैवान
पत्नीनं 5 दिवसांतच जग सोडलं
Crime News:लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीनं शक्तीवर्धक गोळ्या घेऊन शारीरिक संबंध ठेवले, त्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला, असा आरोप नवविवाहित वधूच्या कुटुंबीयांनी केला आहे.
उत्तर प्रदेशमधील (हमीरपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. लग्नाच्या पाचव्याच दिवशी पत्नीचं दुर्देवी निधन झालं. त्यामुळे सगळीकडे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. पत्नीच्या निधनानंतर तिच्या नवऱ्यावर क्रूरतेचे आरोप करण्यात येत आहेत. मृत महिलेच्या कुटुंबियांनी पतीवर शक्तीवर्धक गोळ्या खाऊन शरिरसंबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून परिसरात एकच खळबळ माजली आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीनं शक्तीवर्धक गोळ्या घेऊन शारीरिक संबंध ठेवले, त्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला, असा आरोप नवविवाहित वधूच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबियांच्या आरोपानंतर हमीरपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याशिवाय या प्रकरणाची पारावर अन् टपरीवर दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
हमीरपूर जिल्ह्यातील पीडब्ल्यूडी कॉलोनीमध्ये ही घटना घडली. 3 फेब्रुवारी 2024 रोजी नितिल ओमरेसोब सगुण हिचं लग्न झालं होतं. लग्नात हुंडा देऊन कुटुंबानं आनंदानं आपल्या मुलीचा निरोप घेतला. लग्नाच्या पहिल्याच रात्री महिलेच्या पतीनं शक्तीवर्धक गोळ्या खाऊन शरिरसंबंध ठेवले. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे सासरच्यांनी मुलीच्या कुटुंबीयांना आजाराची खोटी माहिती दिली आणि उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. मुलीवर कानपूरमध्ये उपचार करण्यात आले. पण उपचारादरम्यान मृत्यू झाला. कमी वयात मृत्यू कसा झाला? हे जाणून घेण्यासाठी कुटुंबीयांनी कानपूरमध्ये पोस्टमार्टम केलं. त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. इतकंच नाही तर मृत मुलीनं मृत्यूपूर्वी आपल्या वहिनीला सत्य सांगितलं होतं. आता याप्रकरणी कारवाईची मागणी कुटुंबीय करत आहेत.