ललित पाटीलनंतर ससूनमधून फरार झालेल्या दुसऱ्या कैद्याला अटक
पुणे पोलिसांनी असा रचला सापडा
पुणे ससून रुग्णालयातून कैदी ललित पाटील फरार झाला होता. या प्रकाराची पुनरावृत्ती पुन्हा झाली होती. मार्शल लुईस लीलाकर नावाच्या या कैद्याने पोलिसांना गुंगारा देऊन ससून हॉस्पिटलमधून त्याने पळ काढला आहे. आता आठ दिवसांनंतर त्याला अटक करण्यात यश आले आहे.
पुणे शहरात ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती ११ फेब्रुवारी रोजी झाली होती. पुणे शहरातील ससून रुग्णालयातून ड्रग्स माफिया ललित पाटील ज्या पद्धतीने फरार झाला होता, त्या पद्धतीने आणखी एक कैदी फरार झाला. या कैद्याने गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मार्शल लुईस लीलाकर नावाच्या या कैद्याने पोलिसांना गुंगारा देऊन ससून हॉस्पिटलमधून त्याने पळ काढला आहे. आता आठ दिवसांनंतर त्याला अटक करण्यात यश आले आहे.
पहाटे झाली त्याला अटक
ससून रुग्णालयातून पसार झालेल्या आरोपी मार्शल लुईस लीलाकर याला पोलिसांनी पहाटे पावणे दोनच्या सुमारास अटक केली. लीलाकर ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सायबर पोलिसांच्या ताब्यातून ससून रुग्णालयातून पसार झाला होता. लीलाकर याने कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना सोशल मीडियावर रीलद्वारे अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर धमकी दिली होती.याबाबत पोलिसांनी आरोपी मार्शल लीलाकरला अटक केली.