व्यावसायिकाकडे २५ कोटींच्या खंडणीची मागणी
तक्रारीनुसार यापूर्वी आरोपी महिलेने व्यावसायिकाकडून १५ लाख रुपये घेतले होते. आता २५ कोटी रुपये न दिल्यास संबंधीत चित्
आक्षेपार्ह चित्रफीतीच्या माध्यमातून व्यावसायिकाकडे २५ कोटींच्या खंडणीची मागणी, ३५ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
मुंबईः अंधेरी पूर्व येथील व्यावसायिकाची अश्लील चित्रफीत तयार करून त्याच्याकडे २५ कोटी रुपयांंची खंडणीची मागितल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी ३५ वर्षीय महिलेविरोधात खंडणी व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार यापूर्वी आरोपी महिलेने व्यावसायिकाकडून १५ लाख रुपये घेतले होते. आता २५ कोटी रुपये न दिल्यास संबंधीत चित्रफीत नातेवाईक व मित्र परिवाराला पाठवण्याची तसेच बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची महिलेने धमकी दिली आहे.तक्रारदार याचे अंधेरी परिसरात कार्यालय आहे. तक्रारीनुसार आरोपी महिलेने तक्रारदाराशी नोकरीच्या बहाण्याने ओळख करुन घेतली. तसेच पैशांची आवश्यकता असल्याचे सांगून, अनेक कारणे देऊन १५ लाख रुपये तक्रारदाराकडून घेतले. त्यानंतर चहा पिण्याच्या बहाण्याने २३ जानेवारीला आरोपी महिलेने व्यावसायिकाला घरी बोलावून चहामध्ये गुंगीचे औषध दिले व व्यावसायिकाचे आक्षेपार्ह स्थिती चित्रीकरण केले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी महिलेने व्यावसायिकाला धमकावण्यास सुरूवात केली. १५ दिवसांत २५ कोटी रुपये न दिल्यास चित्रफीत कुटुंबिय, नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यांतही अडवण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नेहमी पैशांच्या मागणीला कंटाळून अखेर व्यावसायिकाने याप्रकरणी अंधेरी येथील अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी खंडणी व बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.