आणखी एका हत्याकांडाने उपराजधानी हादरली

आणखी एका हत्याकांडाने उपराजधानी हादरली
शनिवारी दुपारी दीड वाजता सदरमधील राजनगरात गोळ्या घालून एका माजी पत्रकाराचा भरदिवसा घरात घुसून खून करण्यात आला.
नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात हत्यासत्र सुरुच आहे. शनिवारी दुपारी दीड वाजता सदरमधील राजनगरात गोळ्या घालून एका माजी पत्रकाराचा भरदिवसा घरात घुसून खून करण्यात आला. गेल्या २४ दिवसांतील हे १४ वे हत्याकांड असून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र आहे. विनय पुणेकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे सदरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विनय पुणेकर यांनी काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रात पत्रकार-छायाचित्रकार म्हणून काम केलेले आहे. सध्या ते दिनशॉ कंपनीशी जुळलेले होते. त्यांचे अनेक ठिकाणी पैशाचे व्यवहार होते. आर्थिक व्यवहारातून त्यांचे नेहमी वाद होत होते. शनिवारी दुपारी दीड वाजता पुणेकर हे राजनगर येथील घरी झोपलेले होते. एक युवक प्रवेशद्वार उघडून घरात घुसला. त्याने पुणेकर यांच्यावर गोळीबार केला आणि लगेच त्याने पळ काढला. काही वेळात पुणेकर यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली. सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि ताफा घटनास्थळावर पोहचला. त्यांनी घटनास्थळ पंचनामा करीत मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या