अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार

बुलढाणा : शहरातील एका अल्पवयीन मुलीला डांबून तिच्यावर अमानुष शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये पीडितेच्या मैत्रीणीसह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे प्रशासकीय व पोलीस विभागाचे मुख्यालय असलेले बुलढाणा शहर हादरले आहे. पीडितेच्या आईने घटनेची तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या सूचनेवरून शहर पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपास चक्रे फिरवित तिघा आरोपींना जेरबंद केले. हशिर (अपूर्ण नाव, रा. बुलढाणा ) पूजा जाधव( रा. चिखली ) व दीपक गवई (रा. विजय नगर बुलढाणा ) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरुद्ध कलम ३७६, ,३७६ (२) (एन), ३४४, ३२३, ५०६, ३४ भादवी सहकलम ४, ५ (एल), ६, ८,१२ बालकाचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२, तसेच कलम ३(१) (डब्ल्यू), ३(१)(आर), ३(२) (व्हीए) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडिता १५ वर्षांची असून खामगाव मार्गावरील सुंदरखेड स्थित तार कॉलनी, येथील सत्यम शिवम अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या घरात १७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान डांबून ठेवून तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. मात्र याची तक्रार २९ रोजी उशिरा देण्यात आली.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या