त्या पोलिसाने गाठले क्रूरतेचे कळस!

 

बुलढाणा : प्रतिबंधक कारवाई मधील आरोपीस क्रिकेटच्या बॅट ने अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसाची चित्रफीत सध्या समाज माध्यमावर वेगाने सार्वत्रिक होत आहे. दरम्यान, या प्रकाराबद्दल नेटकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून हा महाराष्ट्र आहे की यूपी- बिहार असा सवाल विचारला जात आहे.

या दृश्यफितीमधील पोलीस आरोपीस ठाण्याच्या फरशीवर झोपवून त्याच्या पायाच्या तळव्यावर बॅटने दणादण मारत असल्याचे व तो व्यक्ती वेदनेने तळमळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच समोर असलेल्या व्यक्तीशी( फिर्यादीसोबत?) अधूनमधून बोलत असल्याचे दिसत आहे. तसेच खाली बसलेल्या व्यक्तीच्या गालफडात हाताने मारत असल्याचे दिसते.

या चित्रिफितीबद्धल विचारणा केली असता त्याला पोलीस विभागाच्या जबाबदार सूत्राने ती खरी असल्याची माहिती दिली. मारहाण करणारा पोलीस संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस ठाण्याचा बिट जमादार नंदकिशोर तिवारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या